" कॅन्सर
" हे एक असे नाव
जे वाचल्यानंतर
मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या जिवाचा थरकाप उडणे अगदी स्वाभाविक आहे. दरवर्षी
कॅन्सरने लाखो रुग्ण
मृत्युमुखी पडतात, आपणापैकी खचितच एखादा असेल त्याचा एखादा नातेवाईक किंवा शेजारी कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडलेला नसावा.
पण
कॅन्सर खरंच इतका जीवघेणा आहे का ?
हा
रोग आहे की फक्त शरीराची
अवस्था ?
रुग्णाचा
मृत्यू नेमका कॅन्सर ने होतो
की इतर घटकही कारणीभूत ठरतात ?
या
सर्व प्रश्नांसंबंधी ही लेखमाला….
ह्या
लेखमालेमध्ये खालील गोष्टींचा ऊहापोह केला जाईल
कॅन्सर
आणि नेमका काय आहे हा कशामुळे होतो
?
याच्या
अवस्था कोणत्या ?
त्याची
सुरुवात कशी होते ?
कॅन्सरपासून
बचाव याचे ऊपाय आणि
कॅन्सर
झाल्यास त्यावरील उपचार संबंधी मार्गदर्शन…
आजचा विषय
- कॅन्सर हा रोग कि अवस्था ?
अगदी कुणालाही
जरी कॅन्सर चे कारण काय असा प्रश्न विचारला तर सहज कुणीही बोलून जातं, धूम्रपान, तंबाखू मुळे कॅन्सर होतो, प्रत्यक्ष प्रॅक्टिस
मध्ये मात्र गेल्या काही वर्षात वेगळेच चित्र बघावयास मिळाले क्लिनिक ला उपचाराकरिता
येणारा प्रत्येक दुसरा कॅन्सर चा पेशंट सांगतो, "डॉ. साहेब तंबाखू तर सोडा, पण
साधी सुपारी देखील शिवली नाही हो !" आणि प्रत्येकाचा असा एखादा मित्र किंवा नातेवाईक
असतो जो गेले कित्येक वर्ष दिवसाला निदान २० सिगारेट्स ओढतो, किंवा दिवसभर तंबाखाचा
तोबरा भरलेला असूनही ठणठणीत असतो.
सुरुवातीला
काही वर्ष मी हि या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं, मात्र याचं कारण शोधल्याखेरीज मन शांत
बसेना तेव्हा वैद्यकशात्राच्या प्राचीन सिद्धांताकडे वळायचे ठरले, कारण आधुनिक मानके
प्रमाणित असली तरी त्यात एकसूत्रतेचा अभाव, तसेच एकाच विषयावर चक्क विरोधी मातेमतांतरे
आणि तीही प्रत्यक्ष्य प्रमाणावर सिद्ध केलेली. तेव्हा 'जुनं तेच सोनं' या न्यायाने
पुरातन हिप्पोक्रटीक मेडिसिन, मटेरिया मेडिका, चायनीज मेडिसिन, आणि ऑफ कोर्स भारतीयांचा
अनमोल ठेवाआयुर्वेद...!!
या सर्व ज्ञानाचा सार काढल्यानंतर कॅन्सरची मूळ पार्श्वभूमी
लक्षात आली कि हा कॅन्सर नेमका होतो कशामुळे
?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रत्येक प्राणिमात्राच्या
शरीराच्या म्हणा किंवा अगदी पेशीच्या पातळीवर जर आपण विचार केला तर लक्षात येतं की
प्रत्येक पेशीच्या तीन मूलभूत गरजा आहेत
१) अन्न किंवा
पोषण
२) ऑक्सिजन
३) विसर्ग
-अर्थात टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे
हे कळल्यानंतर
कॅन्सर नेमका कशामुळे होतो यासाठी खालील दोन मुद्द्यांचा विचार करणे गरजेचे आहे.
पहिला मुद्दा
- जर शरीराच्या कुठल्याही पेशीला या तीन गोष्टी मिळत राहिल्या, तर कुठलीही सजीव पेशी
वर्षानु वर्ष जिवंत राहू शकते मात्र या तीनही
गोष्टी Qualitative आणि quantitative म्हणजेच गुणात्मकदृष्ट्या आणि प्रमाणदृष्ट्या उत्तम
असाव्यात हे गरजेचे आहे.
आणि दुसरा
मुद्दा असा की प्रत्येक पेशीची किंवा प्रत्येक प्राणिमात्राची जिवंत राहण्याची एक अंतर्गत
प्रवृत्ती असते तर वर दिलेल्या तीनही गोष्टी जर गुणात्मकदृष्ट्या किंवा प्रमाणात्मक
दृष्ट्या व्यवस्थित मिळत नसतील तर जिवंत राहण्यासाठी पेशी स्वतःमध्ये काही बदल घडवून
आणते यात बदलांना म्युटेशन असेदेखील म्हणतात आणि म्युटेशन झालेल्या पेशीच म्हणजे कॅन्सरच्या
पेशी किंवा कँसर च्या पूर्वरूपांची सुरुवात असते.
आजकालच्या
बदलत्या जीवनशैलीत या तीनही गोष्टींचा अभाव आपणाला दिसून येतो. घेतले गेलेले अन्न हे
योग्य प्रमाणात न घेणे, त्यातील पोषणमूल्यांचा अभाव, फास्ट फूड जंक फूड सारखे प्रकार,
जिभेच्या चवीसाठी अनेक रसायनं असणाऱ्या पदार्थांचे सेवन, डायटिंग च्या नावाखाली स्वतःला उपाशी ठेवणे इ. सरळ सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अन्न हे शरीराचे
इंधन म्हणून वापरलं जायला हवं. मात्र तेच अन्न योग्य नियमांचे पालन करून सेवन न केल्यास
शरीरावर ''मेटाबोलिक लोड" आणावयाचे कार्य करते...
हीच गोष्ट
शुद्ध हवेच्या आणि विसर्ग या बाबतीत लागू होते.
इतक्या प्रमाणात
दूषित द्रव्ये आत येतात त्यांचा बाहेर विसर्ग देखील शरीराच्या पेशींना शक्य होत नाही
आणि अशा प्रकारे योग्य पोषण न मिळालेल्या पेशी, योग्य प्रमाणात ऑक्सिजन न मिळालेल्या
पेशी, योग्य प्रमाणात पोषण मूल्य न मिळालेल्या
पेशी, योग्य प्रमाणात टाकाऊ पदार्थांचा निचरा
न झालेल्या पेशी जिवंत राहण्यासाठी जी धडपड करतात त्यातून जन्माला येतो कँसर सारखा
जीवघेणा प्रकार. तेव्हा कँसर चिकित्सेचा किंवा बचावाचा मुख्य मार्ग, निरोगी पेशींना
जिवंत राहण्यास सर्वतोपरी मदत करणे हा होय.
तेव्हा कॅन्सर
हा मूलतः रोग नसून ही शरीराची अवस्था किंवा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शरीराने किंवा
पेशींनी केलेली एक धडपड असं म्हणता येईल.
पुढील लेखात
वाचा अन्नासंबंधी माहिती.
कॅन्सर
वर बोलू काही
© डॉ. अनुपम ढवळे
मोबा.
07385016383
कँसर रुग्णाच्या
मागर्दर्शनत सदैव तत्पर - गोदावरी हेल्थकेअर यवतमाळ
हा
लेख शेअर करायचा असल्यास यात कुठलाही बदल न करता शेअर
करावा ही विनंती
हि
लेखमाला नियमित वाचण्यासाठी आमचा ब्लॉग
सबस्क्राईब
करा....
No comments:
Post a Comment